आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या जाणवतात.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की यामागे तुमच्या उशांच्या कव्हरचे फॅब्रिकही कारणीभूत असू शकते?
अनेकदा लोक फक्त आकर्षक दिसावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचे बेडशीट्स आणि उशांची कव्हरं खरेदी करतात.
पण हीच निवड त्वचेला त्रासदायक ठरू शकते आणि केसांनाही खराब करु शकते.
झोपण्यासाठी नेहमीच रेशमी कापडाच्या उशांचे कव्हर वापरणे फायदेशीर ठरते.
यामुळे केसांची दुभंगलेली टोकं टाळता येतात आणि केस मऊसर राहतात.
जर रेशमी कव्हर वापरणे शक्य नसेल किंवा पसंत नसेल, तर सॅटिन फॅब्रिकचे कव्हर्स वापरू शकता.
हे मुरुम आणि कोरड्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून बचाव करतात.
रेशमी किंवा सॅटिन कव्हरर्स मऊसर असतात. त्यामुळे झोपताना केसांचा गुंता होत नाही. यामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या कमी होते.