आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली आहे. आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकतात.
आत्मविश्वास कमी झाल्यास तुमच्या हाती निराशा लागू शकते. यामागे काही सवयी कारणीभूत आहेत. बघा कोणत्या...
अनेक लोकांना स्वतःचीच निंदा करण्याची सवय असते. पण यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो.
स्वतःची चेष्टा करणे यातून तुम्हाला स्वतःबद्दल आत्मसन्मान नाही हे प्रतित होते.
याशिवाय आव्हानांपासून दूर पळण्याची तुमची सवय तुमचा आत्मविश्वास कमी करते. अशी सवय लगेचच बदलायला हवी.
कोणी तुमची प्रशंसा केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो. म्हणून काही लोक मुद्दाम तसे करणे टाळतात.
स्वतःच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतात त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.
या सवयींमध्ये बदल केल्यास तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)