केसातील कोंडा दूर करण्यासाठी 'या' 4 पदार्थांचे करा सेवन

Mar 07,2025

केसातील कोंडा

सध्या केसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. यापैकी केसांमध्ये कोंडा होणे ही अगदीच सामान्य बाब बनली आहे.

रामबाण उपाय

जर तुम्हीसुद्धा केसांतील कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर 'हे' पदार्थ या समस्येवर रामबाण उपाय ठरु शकतात. या पदार्थांविषयी सविस्तर जाणून घ्या.

सूर्यफुलाच्या बिया

केसातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया उत्तम नैसर्गित उपाय ठरु शकतात. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन B आणि झिंक यासारखी पोषक तत्त्वं मुबलक प्रमाणात आढळतात.

पचनक्रिया सुरळीत

सूर्यफुलाच्या बिया पचनक्रिया सुरळीत करण्यासोबत मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यांच्या सेवनाने केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.

पपई

पपईमध्ये पपेन नावाचे एंझाइम असते. हे एंझाइम स्कॅल्पवरील अतिरिक्त तेल आणि रसायने काढून टाकण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते. पपईच्या सेवनाने केसातील कोंड्याची समस्या दूर करता येऊ शकते.

अंडी

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात झिंक आणि बायोटिन आढळते. अंड्यातील हे घटक स्कॅल्प तसेच केसांच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. अंड्याच्या सेवनाने केसातील कोंड्यापासून सुटका मिळवता येऊ शकते.

लसूण

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लसणामध्ये एलिसिन हा अँटी-फंगल घटक आढळतो. केसांतील कोंडा दूर करण्यासाठी हा घटक प्रभावी मानला जातो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story