आपल्या शरीराला योग्य पोषण आणि हायड्रेशन मिळण्यासाठी फळे ही खूप उत्तम स्रोत आहेत. विशेष म्हणजे काही फळे ही अशी असतात ज्यांच्यामध्ये 90% पेक्षा अधिक पाणी आढळते. जी फळे उन्हाळ्यात शरीरामध्ये थंडावा तयार करण्यासाठी मदत करतात तसेच आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात.
स्ट्रॉबेरी हे एक असे फळ आहे ज्यामध्ये 91% पाण्याची पातळी असते. स्ट्रॉबेरी ही केवळ स्वादिष्टच नसते तर त्यामध्ये व्हिटॅमिन c,फायबर आणि भरपूर एंटीऑक्सीडेंट्स पण आढळतात. स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात थंडावा तयार होतो.
कलिंगड हे फळ 92% पाण्याने बनलेले आहे ज्यामुळे उन्हाळ्यात ते सर्वात लोकप्रिय फळ ठरते. यांमध्ये असलेले पाणी आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतात. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन a , c आणि भरपूर एंटीऑक्सीडेंट्स असतात. कलिंगड हे संपूर्ण पाण्याने भरलेले कमी कॅलरी असणारे फळ आहे.
अननसामध्ये सुद्धा जवळपास 86-90% पाणी असते.हे फळ त्याच्या गोड स्वादासोबतच शरीरामध्ये चालणाऱ्या पाचनक्रियेतसुध्दा मदत करते तसेच अननस हे फळ शरीरामधील पाण्याची कमतरता पूर्ण करते.
संत्र सुद्धा पाण्याने भरलेले फळ आहे ज्यामध्ये जवळपास 86-90% पाणी असते. संत्र हा व्हिटॅमिन c चा सगळ्यात उत्तम स्रोत आहे तसेच संत्र्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये सुद्धा वाढ होते. संत्र्यामध्ये असणारे फायबर शरीरामधील ओलावा टिकवून ठेवतात आणि पाचनक्रिया सुधारतात.
काकडी ही एक प्रकारची फळभाजीच आहे पण काकडीला अधिक वेळा फळांच्या श्रेणी मध्येच मोजले जाते, काकडीमध्ये जवळपास 95% पाणी असते ज्यामुळे आपल्या शरीराला योग्य हायड्रेशन मिळते. काकडीमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि शरीरसुद्धा हायड्रेट राहते.
अशी फळे जी शरीरातील पाण्याची मात्रा उच्च ठेवतात आणि उन्हाळ्यात होणाऱ्या डीहायड्रेशनला सुद्धा थांबवतात. या फळांच्या सेवनामुळे शरीर केवळ तजेलदार राहत नाही तर शरीराला आवश्यक असणारी पोषकतत्वे मिळतात. उन्हाळ्यात जास्तीत जास्त या फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे.आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)