'या' 6 लोकांनी अजिबात खाऊ नये भाजलेला मका, अन्यथा...

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

पावसाळ्यात अनेकांना भाजलेल्या मक्याचा आस्वाद घेण्याचा मोह आवरत नाही. मात्र काही आजार असलेल्या लोकांनी भाजलेला मका खाणं टाळावं.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

डायबिटीजचे रुग्ण :

मक्यामध्ये प्राकृतिक साखर आणि कार्बोहायड्रेटची मात्रा भरपूर प्रमाणात आढळते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळे डायबेटिज रुग्णांनी भाजेलला मका खाणं टाळावं.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

पचनाची समस्या :

भाजलेल्या मक्यामध्ये हाय फायबर असते जे पचनासाठी चांगलं असतं पण ज्या लोकांना पोट फुगण्याची समस्या असते किंवा गॅस, IBS ची समस्या असते अशांचं आजारपण वाढू शकतं.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

एलर्जी :

काही लोकांना मक्याची ऍलर्जी असते. मका खाल्ल्याने त्यांना स्किन रॅश, खाज, सूज आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या जाणवतात. ऍलर्जीचा इतिहास असेल तर अशा लोकांनी मका खाणं टाळावं.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

वजन कमी करणारी लोकं :

भाजलेल्या मक्यामध्ये कॅलरीज आणि कार्ब्स भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी याच जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन कमी करणे कठीण होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

किडनीचे रुग्ण :

मक्यामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फोरसची मात्र जास्त असते. जे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे किडनीच्या कार्यावर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

हृदयरोगी:

मका मीठ आणि बटर लावून खाल्ला तर हे हृदयरोग्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Aug 09, 2025

VIEW ALL

Read Next Story