काही लोकांनी सेंधव मीठ खाणं टाळलं पाहिजे, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
ज्यांचा बीपी आधीच जास्त असतो त्यांनी हे मीठ जास्त खाल्ल्यास त्रास वाढू शकतो.
सेंधव मीठामुळे किडनीवर जास्त ताण येऊ शकतो.
सेंधव मीठ हृदयाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सूज आणि हृदयावर भार वाढतो.
सेंधव मीठामध्ये आयोडिन नसतं. त्यामुळे ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे मीठ योग्य नाही.
गर्भावस्थेत जास्त सेंधव मीठ खाल्ल्यास सूज, ब्लड प्रेशर किंवा पचनाशी संबंधित त्रास वाढू शकतो.
सेंधव मीठ अनेकांसाठी फायदेशीर असलं तरी वरील गटातील लोकांनी ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.