अनेकजण धार्मिक मान्यतेनुसार उपवास, व्रत इत्यादी ठेवतात. उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत.
काही लोकांना उपवास केल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, तेव्हा डॉक्टर सुद्धा अशा व्यक्तींना उपवास न करण्याचा सल्ला देतात.
डायबेटिज : डायबेटिजच्या रुग्णांनी वेळेवर जेवणे, औषध घेणे इत्यादी गरजेचे असते. अशावेळी या रुग्णांनी उपवास करणं टाळावं अन्यथा त्यांच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी उपवास करणं टाळावं. कारण उपवास केल्यास त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं
नुकतीच मोठी सर्जरी झालेल्या लोकांनी उपवास ठेऊ नये. कारण जखम सुकण्यासाठी शरीराला आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सची गरज आहे.
ज्या व्यक्तींच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल अशा व्यक्तींनी उपवास केल्यास त्यांना अधिक थकवा येऊ शकतो.
फुफुसासंदर्भात काही त्रास असल्यास अशा व्यक्तींनी सुद्धा उपवास करणं टाळायला हवं.
गरोदर महिलांना सतत व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. तेव्हा त्यांनी उपवास ठेवल्यास त्याचा बाळावर आणि महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)