किचनमधील या गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, लगेचच बाहेर काढा

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

स्वयंपाक घरातील दररोजच्या वापरातील काही वस्तू आणि अन्नपदार्थ हे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. जर तुम्हालाही तुमचे स्वयंपाकघर सुरक्षित आणि निरोगी हवे असेल तर आजच काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

प्रोसेस्ड फूड्स :

पॅकेट स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स आणि केक मिक्स सारख्या प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये हानिकारक केमिकल्स आणि प्रिज़र्वेटिव्स असतात. यामुळे वजन आणि पचनक्रियेवर परिणाम होतोच पण, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

तळलेलं अन्न :

जर तुम्ही जास्त प्रमाणात तळलेले अन्न पदार्थ खात असाल ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. तळलेल्या अन्नात अ‍ॅक्रिलामाइड नावाचा घटक असतो ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

प्लास्टिक कंटेनर :

बऱ्याचदा प्लास्टिक कंटेनर आणि स्टोरिंग बॅगमध्ये बीपीए सह अनेक केमिकल्स आढळतात. गरम खाण्याच्या संपर्कात येताच हे रसायन जेवणात मिसळून शरीरात जाऊ शकते. तेव्हा जेवण स्टोअर करण्यासाठी प्लास्टिक कंटेनर टाळा.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

पॅकेज ड्रिंक्स :

सोडा, जूस आणि पॅकेज ड्रिंक्समध्ये हाय शुगर आणि एडिटिव्स असते. जे डायबिटीजचं कारण ठरू शकते. काही रिसर्चनुसार यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा वाढू शकतो.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

कलर्ड फूड :

अनेक पॅकेट फूडमध्ये रंग आणि चव वाढविण्यासाठी रसायने वापरली जातात. हे पदार्थ कालांतराने शरीराच्या पेशींवर परिणाम करू शकतात आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवू शकतात.

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Pooja Pawar | Aug 23, 2025

VIEW ALL

Read Next Story