ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्ती बुद्धिमान असण्याचा सरळ संबंध हा त्याच्या राशी आणि त्याच्या स्वामी ग्रहाशी असतो.
काही राशीच्या लोकांची बुद्धिमत्ता इतकी तीक्ष्ण असते की त्यामाध्यमातून ते विविध विषयांचं ज्ञान अवगत करतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी कोणीही करू शकत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक खूप हुशार असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार या राशीवर बुद्धिमत्तेचा ग्रह बुध ग्रह राज्य करतो.
बुद्धिमत्ता आणि वाणीचा ग्रह असलेल्या बुध राशीच्या प्रभावामुळे, मिथुन राशीचे लोक प्रतिभावान आणि गोड बोलणारे असतात.
ज्योतिषशास्त्रात कन्या राशीचे लोक खूप बुद्धिमान मानले जातात, कन्या राशी सुद्धा बुध ग्रहाची आहे.
कन्या राशीचे लोकं प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करतात.
या राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. तसेच हे लोक खूप ज्ञानी असतात.
मेष राशीच्या लोकांनी नेहमी कान आणि डोळे खुले ठेऊन विचार करतात. तसेच प्रत्येक परिस्थितीमध्ये सतर्क राहतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)