सध्या केसांशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवत असतात. केसगळती तसेच केस कोरडे होणे या तर अगदीच सामान्य समस्या झाल्या आहेत. यासाठी लोक विविध प्रकारच्या महागड्या शॅम्पू किंवा तेलाचा वापर करतात.
त्वचेसोबत केसांसाठीसुद्धा अॅलोवेरा जेल फायदेशीर ठरले आहे. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई तसेच बरेच अॅंटीऑक्सीडेंट्स आढळतात.
अॅलोवेरा जेलमध्ये असणारे पोषक तत्त्वं केसांच्या मुळांपर्यंत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे केसगळती कमी होऊन केस मऊ आणि रेशमी होतात.
सर्वात आधी झाडावरुन ताजं कोरफड कापून घ्या. कोरफडीच्या वरच्या आणि खालच्या भागातील पाने चाकूने कापून घ्या.
कोरफडीचा हिरवा भाग कापून घेतल्यावर त्यातील पांढरे जेल काढून घ्या.
अॅलोवेरा जेलला तुम्ही केसांवर लावू शकता. हे जेल हातांनी किंवा ब्रशच्या साहाय्याने केसांवर लावून घ्या.
काही काळ केसांमध्ये जेल ठेवल्यानंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. असे केल्याने केस रेशमी आणि चमकदार होण्यास मदत होते.
अॅलोवेरा जेल केसांवर लावल्याने रुक्ष आणि कोरड्या केसांपासून सुटका मिळवता येऊ शकते.
कोणतीही अॅलर्जी असल्यास पॅच टेस्ट केल्याशिवाय केसांवर कोरफडीचा वापर करु नका.