अनेकदा बरेच उपाय करुनदेखील हातांवरील मेहंदी हवी तशी रंगत नाही.
जर तुम्हालादेखील मेहंदीचा गडद रंग हवा असेल तर मेहंदी सुकल्यानंतर त्यावर काही मिश्रण नक्की लावा.
मेहंदी सुकल्यानंतर साखर आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन कापसाच्या सहाय्याने ते मेहंदीवर लावा.
मेहंदी लावण्याआधी हातांवर पेपरमिंटचे तेल लावून घ्या. यामुळे मेहंदीचा गडद रंग येण्यास मदत होईल.
मेहंदी धुतल्यानंतर गरम तव्यावर लवंग टाकून हातावर त्याची वाफ घेतल्याने मेहंदीला गडद रंग येतो.
याव्यतिरिक्त, मेहंदी सुकल्यावर हातांवर मोहरीचे तेल घासून त्याच्या साहाय्याने सुकलेली मेहंदी काढा. यामुळे मेहंदीला अगदी सुरेख रंग येतो.