भांडी ठेवण्याची मांडणी चिकट झालीये, 'या' पद्धतीने करा स्वच्छ, नव्यासारखी चमकेल

Mar 05,2025

मांडणीचा वापर

स्वयंपाकघरात कमी जागेत भांडी ठेवण्यासाठी अनेकजण मांडणीचा वापर करतात. मात्र अधिक काळापर्यंत मांडणीचा वापर केल्यानंतर ती खूपच चिकट होते.

मांडणी स्वच्छ करणे

चिकट मांडणी स्वच्छ करणे अवघड होऊन बसते. काही टीप्सच्या साहाय्याने तुम्ही चिकट झालेली मांडणी सोप्यारितीने स्वच्छ करु शकता.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे घाण किंवा चिकटपणा दूर करण्यासाठी प्रभावी असतात. याचा वापर करुन तुम्ही चिकट झालेली मांडणी सहजपणे स्वच्छ करु शकता.

मिश्रण

यासाठी एका बाऊलमध्ये पाणी आणि 2 चमचे बेकिंग सोडा घ्या. आता हे मिश्रण जुन्या किंवा अनावश्यक ब्रशच्या साहाय्याने भांड्यांच्या मांडणीवर घासा.

लिक्विड डिश वॉश

आता 15 मिनिटे हे मिश्रण मांडणीवर तसेच ठेवा आणि नंतर एका वाटीमध्ये लिक्विड डिश वॉश आणि पाणी एकत्र करा.

सॉफ्ट स्क्रबर

आता वाटीमधील तयार मिश्रणात सॉफ्ट स्क्रबर बुडवा आणि त्याच्या मदतीने मांडणी घासून स्वच्छ करा.

धुवून घ्या

यानंतर पाण्याने मांडणी धुवून घ्या. या टीप्सच्या वापराने मांडणीचा चिकटपणा सोप्यारितीने दूर होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story