तुमच्या घरातील रोपं आणि झाडं उन्हाळ्याच्या दिवसांत सुकून जातात. अशावेळी या टिप्स लक्षात घ्या.
सगळ्यात पहिले मातीचे परिक्षण करुन करा आणि गरजेनुसार पाणी टाकत जा
जास्त पाणी टाकू नका यामुळं मुळं कुजू शकतात. त्यामुळं पाण्याची पातळी योग्य असावी
पाण्याच्या बरोबरच रोपांना उन्हे दाखवण्याचीदेखील गरज आहे. पण ऊनदेखील खूप जास्त दाखवू नका त्यामुळं रोपांना नुकसान होऊ शकते.
मातीत पोषक तत्वांची कमी होऊ शकते. त्यासाठी वेळोवेळी खत टाकू शकता. पानांवर धुळ, किडे पडू शकतात. त्यामुळं रोपं साफ करा. गरज पडल्यास लिंबाचे तेल शिंपडा.
झाडांची पाने पिवळे होत असतील म्हणजे यात आयर्न आणि नायट्रोजनची कमतरता होऊ शकता. कोमजलेले पानं आणि सुकलेल्या फांद्या काढून टाका.