उन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Apr 17,2024

उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

अशावेळी गाईच्या दुधाचे की म्हशीच्या दुधाचे दही लावावे हा प्रश्न पडतो. तसेच विकतसारखं घट्ट दही घरच्या घरी कसं लावायचंय?

एका भांड्यात एक कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्याच फुल फॅट म्हशीचे दूध घाला.

गॅस मध्यम आचेवर ठेवून 10 मिनिटानंतर दुधाला उकळी फुटल्यावर बंद करा.

दूध कोमट झाल्यानंतर एका भांड्यात दोन चमचे दही घालून फेटून घ्या

दह्याला क्रिमी टेक्सचर आल्यानंतर त्यात दूघ ओता 3 तासांनी प्लेट ठेवा. 3 तास रुम टेम्प्रेचर आणि 2 तास फ्रिजमध्ये दही सेट करा.

अगदी सुरीने कापता येईल इतकं घट्ट दही तयार होईल.

VIEW ALL

Read Next Story