तांब्याचं भांडं काळं पडलंय? 'या' गोष्टी वापरुन नव्यासारखं चमकेल भांडं

Published by: Zee Team | Mar 05, 2025

तांब्याची भांडी

पुजेसाठी वापर करण्याव्यतिरिक्त आरोग्यासाठीदेखील तांब्याच्या भांड्याचे अनेक फायदे आहेत. खास करुन तांब्याची भांडी ही पाणी साठवण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

काळेपणा

परंतु, नियमितपणे तांब्याच्या भांड्यांचा वापर केल्याने ती काळी पडतात आणि तांब्याची भांड्यांवरील काळेपणा सहजासहजी निघत नाही.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

'या' 4 गोष्टी

जर तुम्हाला तांब्यांच्या भांड्यांवरील काळेपणा दूर करुन नव्या भांड्यासारखी चमक आणायची असेल, तर 'या' 4 गोष्टी वापरुन भांडी स्वच्छ करा.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

साहित्य

यासाठी लागणारे साहित्य: मातीचा दिवा, लिंबाचा रस, पांढरे मीठ आणि बेकिंग सोडा.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

पेस्ट तयार करुन घ्या

सर्वात आधी एका जुन्या मातीचा दिव्याची अगदी बारीक पावडर तयार करुन घ्या. आता या मातीच्या पावडरमध्ये लिंबाचा रस, पांढरे मीठ आणि बेकिंग सोड्यासोबत थोडे पाणी घालून पेस्ट तयार करुन घ्या.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

10 ते 15 मिनिटे

आता काळं पडलेल्या तांब्याच्या भांड्यावर ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे व्यवस्थितरित्या लावून ठेवा.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

लिंबाच्या साली

आता त्या भांड्याला लिंबाच्या सालींच्या साहाय्याने हलक्या हाताने घासा.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

पुसून घ्या

यानंतर तांब्याचं भांडं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर सुती किंवा कॉटनच्या कापडाने पुसून घ्या. असे केल्याने भांड्यावरील काळेपणा दूर होऊन भांडं अगदी नव्यासारखं चमकेल.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

Disclaimer

इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.

Published by: Zee Team | Mar 05, 2025

VIEW ALL

Read Next Story