पांढऱ्या कपड्यावरील तेलकट, मसाल्याचे डाग चुटकीसरशी काढण्यासाठी 'या' टीप्स

Mar 06,2025

डाग

अनेकदा बाहेर असताना किंवा घरात काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डाग कपड्यांना लागतात आणि अशा वेळी पांढऱ्या कपड्यांवर लागलेले डाग तर अगदी स्पष्टच दिसतात.

'या' टीप्स

तुमच्या कपड्यालादेखील असेच तेलाचे किंवा मसाल्याचे चिकट डाग लागले असतील, तर 'या' टीप्सचा वापर करुन तुम्ही हे डाग चुटकीसरशी घालवू शकता.

साहित्य

यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा बेकिंग सोडा, अर्ध्या लिंबाचा रस, पांढरे व्हिनेगर, लिक्विड डिटर्जेंट आणि 1 कप पाणी.

एकत्र मिसळून...

आता हे सर्व साहित्य एकत्र मिसळून एका स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन व्यवस्थित शेक करुन घ्या.

तयार मिश्रण

आता तयार मिश्रण कपड्यावरील तेलाच्या किंवा मसाल्याच्या डागावर स्प्रेच्या बाटलीतून शिंपडा.

ब्रशचा वापर

एका जुन्या किंवा निरोपयोगी ब्रशचा वापर करुन हे मिश्रण त्या डागावर घासा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

2 ते 3 वेळा

2 ते 3 वेळा ही पद्धत अवलंबल्यास कपड्यावरील अगदी हट्टी आणि चिकट डाग पूर्णपणे नाहीसा होईल.

VIEW ALL

Read Next Story