कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी तोंडात चघळल्याने लाळेचे उत्पादन वाढते, ज्यामुळे तोंड स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच दातांना कीड लागत नाही.
रिकाम्या पोटी कडुलिंब खाल्ल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
दररोज रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. गॅस, बद्धकोष्ठता आणि फुगण्याची समस्या असल्यास कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आराम मिळेल.
दररोज कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते.
कडुलिंब शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते ज्यामुळे शरीर आतून निरोगी होत. यामुळे त्वचा स्वच्छ आणि पिंपल्स मुक्त होऊ शकते.
कडुलिंबाच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.
कडुलिंबाची पाने ही सांधेदुखीवर सुद्धा प्रभावशाली ठरू शकतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे संधिवात सारख्या समस्यांवर आराम मिळतो.
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चिघळल्याने यकृतासाठी देखील फायदेशीर आहे. कडुलिंब यकृत डिटॉक्स करण्याचे काम करते.
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)