जगातील श्रीमंतांची शहरं कोणती?' या' 10 शहरात राहतात टॉप अब्जाधिश

जगभरातील बरेच देश हे विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर काही देश हे तिथे राहणाऱ्या अब्जापतींमुळे ही ओळखले जातात. 2024च्या अहवालानुसार जाणून घेऊयात जगभरातील कोणत्या शहरात किती अब्जाधीश राहतात.

न्यूयॉर्क

अमेरीकेतील न्यूयॉर्क हे शहर श्रीमंतांचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात 101 अब्जाधिश राहतात.

हाँगकाँग

जागतिक पातळीवरील विकसित शहरांच्या यादीत हाँगकाँगचा समावेश होतो. असं म्हणतात की हाँगकाँगमध्ये एकूण 70 अब्जाधिश राहतात.

बीजिंग

चीनच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून बीजिंग शहराला ओळखलं जातं. असं म्हणतात की या शहरात 68 अब्जाधिश राहतात.

शांघाय

चीनच्या विकसित शहरांपैकी एक म्हणून शांघाय ओळखलं जातं . या शहरात 65 अब्जाधिश राहतात.

लंडन

जागतिक पातळीवर आर्थिक आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून लंडन कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. या ठिकाणी 63 अब्जाधिश राहत असून जगामध्ये विकसित शहर म्हणून लंडन पाचव्या क्रमांकावर येते.

मॉस्को

रशियातील हे शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर या शहरात एकूण 61 अब्जाधिश राहतात.

मुंबई

भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 56 अब्जाधिश राहत असल्याचं म्हटलं जातं.

शेनजेन

दक्षिण चीन मधील हे सर्वात महत्त्वाचं शहर मानलं जातं. या शहरात 54 अब्जाधिश राहत असून जगामध्ये विकसित शहर म्हणून शेनजेन आठव्या क्रमांकावर येतं.

दिल्ली

भारताची राजधानी आणि राजकीय केंद्रबिंदू म्हणून दिल्लीला ओळखलं जातं. दिल्लीत एकूण 37 अब्जाधिश राहतात.

सेन फ्रांसिस्को

अमेरिकेतील या शहरात 37 अब्जाधिश राहत असून जगातील विकसित शहरांच्या यादीत सेन फ्रांसिस्को दहाव्या क्रमांकावर येतं.

VIEW ALL

Read Next Story