लय भारी 'कोल्हापूर' ! 5 ठिकाणं तुम्हाला करतील मंत्रमुग्ध

Pooja Pawar
Apr 02,2025

न्यू पॅलेस म्यूजियम :

न्यू पॅलेस म्यूजियम हे कोल्हापूरमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या म्यूजियममध्ये तुम्हाला राज घराण्यातील अनेक वस्तू पाहायला मिळतील.

श्री महालक्ष्मी मंदिर :

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी आणि महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. याला दक्षिण काशी असेही संबोधले जाते.

ज्योतिबा मंदिर :

ज्योतिबा मंदिर हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिकस्थळ आहे. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळं आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर आणि रामलिंगाची आहेत.

कोपेश्वर मंदिर :

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर हे स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून महादेव व भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या मंदिराला भारत सरकारकडून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पन्हाळा किल्ला :

पन्हाळा किल्ला हा सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला असून 11 व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता. सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. याच किल्ल्याच्या पायथ्याशी पावनखिंड आहे. जिथे वीर बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या सैन्याने छत्रपती शिवाजी महाराजांना मुघलांच्या वेढ्यातून बाहेर काढले होते.

श्री बाळूमामा मंदिर :

संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात.श्री संत बाळूमामा यांची समाधी आद्मापूर येथे आहे.

रंकाळा तलाव :

रंकाळा तलाव हे कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळ असून याला रंकाळा चौपाटी म्हणून देखील ओळखले जाते. रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिरापासून अवघ्या 2 किमी अंतरावर आहे.

VIEW ALL

Read Next Story