Recipe: न लाटता न थापता तांदळाच्या भाकऱ्या करण्यासाठी टिप्स!

Mansi kshirsagar
Jul 26,2024


भाकऱ्या करायच्या म्हटलं की पीठाची उकड काढून मग थापून कराव्या लागतात.


मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात भाकऱ्या न थापता कशा करायच्या याची माहिती दिली आहे.


वसई, विरार परिसरात या भाकऱ्यांना खापोळेदेखील म्हणतात. याची कृती जाणून घेऊयात

साहित्य

तांदळाचं पीठ, मीठ आणि पाणी

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यात तांदळाचं पीठ घेऊन त्यात थोडं थोडं पाणी टाकत जा.


पाणी टाकून पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशाप्रकारे करुन घ्या. पीठ हातानेच तयार करा


त्यानंतर एकीकडे तवा तापत ठेवून त्यावर हे पीठ टाकून हातानेच डोश्याप्रमाणे पसरवून घ्या व झाकण ठेवा


एक दोन मिनिटांनी झाकण काढून भाकरी चांगली परतवून घ्या.

VIEW ALL

Read Next Story