लांबच्या प्रवासाला निघताय? 'हे' 6 दीर्घकाळ टीकणारे पदार्थ Trip करतील लज्जतदार

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

प्रवास

जी मंडळी सतत प्रवास करतात, त्यांना बाहेर खाण्यापिण्याच्या समस्यांचा अनेकदा सामना करावा लागतो.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

पदार्थ

आता मात्र त्याची चिंता करण्याची गरज नाही. कारण, इथं आपण असे पदार्थ पाहणार आहोत जे लवकर खराब न होता प्रवासातली भूक सहजगत्या भागवतात.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

पुरी

प्रवासासाठी खाऱ्या पुऱ्या किंवा साधी पुरी नेता येते. याशिवाय पोह्याचा चिवडासुद्धा पोटभरीचा ठरतो.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

सुकामेवा

प्रवासाला निघालं असता सुकामेवा, प्रोटीन बार, चिक्की हे पदार्थसुद्धा मदतीचे ठरतात.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

पराठे

कोरड्या मसाल्यांचा वापर करून किंवा सातूचं मिश्रण भरून तयार केलेल पराठे, कोरड्या कचोऱ्या असे पदार्थ नेता येतात.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

थेपले

तेलावर परतून बनवलेली बटाट्याची भाजी, ज्यामध्ये पाण्याचा शून्य वापर असेल तीसुद्धा घडीच्या पोळीसोबत नेली असता किमान दोन दिवस टिकते. प्रवासासाठी थेपले किंवा तत्सम पोळीचे प्रकार नेले असताही खाण्यापिण्याची सोय अगदी सहज होऊ शकते.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

लक्षात घ्या...

लक्षात घ्या, प्रवासात निघालं असता मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला आणि इतरांनाही कोणत्या अडचणींचा सामना करता येणार नाही.

Published by: Sayali Patil | Sep 02, 2025

VIEW ALL

Read Next Story