प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये मुक्कामासाठी कोणता मजला सर्वात सुरक्षित?

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

प्रवास

दूरच्या प्रवासाला गेलं असता काही मंडळी होम स्टेला पसंती देतात तर, काहींना मात्र हॉटेलमध्येच राहण्याचा पर्याय योग्य वाटतो. पण, इथंही योग्य रुमची निवड करणं महत्त्वाचं ठरतं.

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

पर्यटन

पर्यटन आणि या क्षेत्रातील जाणकारांच्या मते भटकंतीसाठी बाहेर असतेवेळी हॉटेलमध्ये मुक्काम असल्यास तिथं तिसऱ्या ते सहाव्या मजल्यादरम्यान रुम घेणं सुरक्षित ठरतं.

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

आगीच्या घटना

दुर्दैवानं आग लागणं किंवा तत्सम कोणता प्रकार घडल्यास या दरम्यानच्या मजल्यांपर्यंत सहजपणे अग्निशामक दलालला पोहोचणं शक्य आहे. ज्यामुळं इथं मदतकार्य लवकर पोहोचतं.

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

बचावकार्य

आगीच्या घटनांमध्ये हॉटेलमध्ये तिसऱ्या ते सहाव्या मजल्यांवर मुक्कामी असल्यास पायऱ्यांवाटे खाली उतरणं अधिक सोपं होतं.

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

चोरीचा धोका

काहींच्या मते तिसऱ्या ते सहाव्या मजल्यावरील रुममध्ये पोहोचणं कठीण असल्यानं चोरीचा धोका नसतो. शिवाय या मजल्यांवर तुलनेनं गोंधळही कमी असतो.

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

सुरक्षिततेचीही हमी

वर नमुद केलेल्या मजल्यांवर हॉटेलमधील कर्मचारी सहज लक्ष ठेवू शकतात. ज्यामुळं रुमच्या स्वच्छतेपासून, सुरक्षिततेचीही हमी मिळते.

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

हॉटेल बुकिंग

अनेक हॉटेल बुकिंगदरम्यान या मजल्यांवरील रुम सहज उपलब्ध होतात. कारण अनेकांचच प्राधान्य वरील मजल्याच्या रुमना असतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Nov 19, 2025

VIEW ALL

Read Next Story