हातांवरील मेहंदी आणखी गडद करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

लग्नसराईचा सिझन सुरु झाला की बाजारपेठेत लग्नातील कपडे खरेदी पासून फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट शोधण्याची तयारी दिसून येते. या दरम्याण नवरीचा मेकअप आणि तिची मेहंदी कशी असावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो.

आजकाल वेगवेगळ्या पद्धतीच्या मेहंदीची थीम आल्यामुळे वधूची मेहंदी जितकी चांगली काढता येईल तितकी ती सुंदर बनविण्याचा प्रयत्न मेहंदी आर्टिस्ट करतात. ब-याचवेळा मेहंदी चांगली काढलीही जाते मात्र त्याचा रंग किती गडद होतो याकडे सर्वांचे लक्ष असते.

असं म्हणटलं जातं की जितका मेहंदीचा रंग गडद असतो तितकं नव-याचं प्रेम जास्त असतं. ही कल्पना जरी हासवणारी वाटत असली तरी अनेकदा मेहंदी रंगत नाही म्हणून अनेक मुली निराश होतात. त्यामुळे या सेप्या टीप्स वापरा आणि तुमच्या मेहंदीचा कंग गडद करा.

हातावर मेहंदी काढल्यानंतर त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मेहंदीवर साखरेचे पाणी न लावता केवळ लिंबूचा रस आणि त्यात साखर मिसळून तो रस मेहंदीवर लावावा त्यामुळे मेहंदी गडद होते.

मेहंदी काढताना ती कधीही पाण्याने धुवू नये त्या जागी मेहंदी काढण्याच्या 4-5 तास आधी तेल लावावे त्यानंतर ती खरडून काढावी.

तुम्ही जास्त वेळ हाताला मेहंदी लावून ठेवू शकत नसल्यास मेहंदी काढल्यानंतर ती साधारण 3-4 तास ठेवावी त्यात 3-4 वेळा त्यावर लिंबू-रस आणि साखर यांचे मिश्रण लावावे. त्यानंतर ती हाताने खरडून त्यावर विक्स किंवा आयोडेक्स किंवा मोहरीचे तेल लावावे आणि 6-7 तास ठेवावे.

मेहंदी हाताने काढल्यानंतर तुम्ही त्यावर नीलगिरीचे तेल लावू शकतो निलगिरीचे तेल हे उष्ण असल्याने मेहंदीचा रंग गडद होतो.

मेहंदी काढलेल्या हातावर तुम्ही लवंगाचा धूर ही घेऊ शकता तसेच लोणच्याचे तेलही लावू शकता ज्यामुळे मेहंदी गडद होण्यास मदत होते.

सर्वात महत्वाचे कोणत्याही कार्यक्रमासाठी मेंदी लावायची असेल तर निय‍त तिथीच्या एक किंवा दोन दिवस आधी मेंदी लावायला हवी. ज्यानेकरून मेहंदीला गडद रंग चढतो.

VIEW ALL

Read Next Story