अनेकदा लोक चेहरा, हात आणि पाय उजळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण शरीराच्या इतर भागांकडे मात्र दुर्लक्ष करतात.
त्यामुळे पाठीवर काळसरपणा निर्माण होतो. काही लोकांची पाठ इतकी काळवंडते की त्यांना आपले आवडते कपडे घालणेही नकोसे वाटते.
जाणून घेऊयात पाठीवरील काळसरपणा कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.
पाठीवर दही लावल्याने त्वचेच्या रंगात लगेच फरक पडतो. दही त्वचेचं पोषण करतं आणि नैसर्गिक उजळपणा देतं.
काळसरपणा कमी करण्यासाठी बटाट्याचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. तो पाठीवर लावल्यास त्वचेवरची काळी छटा कमी होते.
कोरफडीमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. पाठीचा काळेपणा कमी करण्यासाठीही कोरफडीच्या गराचा वापर करू शकता.
संत्र्याच्या गरामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे पाठीवर लावल्यास त्वचा उजळते आणि काळसरपणा हळूहळू कमी होतो.