आताच करून पाहा 'ही' हॉटेलसारखी चटकदार मसाला खिचडी!

Intern
May 29,2025


जर तुम्हालाही रोजच्या साध्या आणि मऊसर खिचडीला कंटाळा आला असेल आणि काहीतरी चविष्ट, झणझणीत आणि आरोग्यदायी खायची इच्छा असेल, तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे.


आज आम्ही तुम्हाला अगदी हॉटेलसारखी, झणझणीत आणि पौष्टिक मसाला खिचडी घरी बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

साहित्य

तांदूळ, मूग डाळ, पाणी, हिरव्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, कांदा, बटाटे, बीन्स, गाजर, वाटाणे, टोमॅटो, हळद, तिखट, गरम मसाला, तूप, मोहरी, जिरे, आले, लसूण आणि धणे

कृती

तांदूळ आणि मूगडाळ स्वच्छ धुवून 10 मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पाण्यासह कुकरमध्ये दोन शिट्ट्यांपर्यंत शिजवा.


कढईत तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि सुक्या मिरच्या घाला. नंतर त्यात कांदा, बटाटा, गाजर, बीन्स आणि मटार घालून चांगले परतून घ्या.


नंतर टोमॅटो, हळद, तिखट आणि गरम मसाला घालून आणखी थोडा वेळ परतवा. हवे असल्यास थोडे पाणी घालून एक उकळी आणा.


शिजलेली डाळ आणि तांदूळ यात घालून व्यवस्थित एकजीव करा. मंद आचेवर काही मिनिटे शिजवा.


शेवटी वरून थोडं तूप घालून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. ही खिचडी दही, पापड किंवा लोणच्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.


ही मसाला खिचडी चवीलाही जबरदस्त आणि आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. एकदा करून पाहा, पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल.

VIEW ALL

Read Next Story