साधारणपणे 3 हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्राचीन धर्मग्रंथांमध्ये तुळशीचा उल्लेख आहे. घरात किंवा घरासमोर औषधी गुणधर्म असलेली तुळस लावणं पवित्र मानलं जातं.
अनेकदा घरात तुळशी रोप लावल्यावर ते टिकत नाही किंवा त्याची नीट वाढ होत नाही. पण यासाठी काही टिप्स फॉलो केल्यास तुमची तुळस छान वाढेल.
तुळस लावताना मातीच्या कुंडीचा किंवा मातीच्या वृदांवनाचा वापर करा.
हे रोप लावताना कोणत्याही मातीचा वापर केला तरी चालतो. पण ती माती सकस असणे गरजेचे आहे.
तुळस लावताना खत म्हणून तुम्ही कडुलिंबाचा पाला किंवा शक्य असल्यास शेणखतही घालू शकता.
लक्षात घ्या तुळशीच्या रोपाला कमीतकमी 4 ते 5 तास स्वच्छ सुर्यप्रकाशाची गरज असते.
तुळशीला एक दिवसाआड पाणी घाला आणि पाणी घालताना पानांवर पाणी घालू नका.