घोड्याच्या पायांना लोखंडाची नाळ लावलेली असते, पण यामागचे कारण माहितीये का?
घोड्याच्या पायांना लोखंडाची नाळ ही खुरं झिजू नये यासाठी लावली जाते. त्यांना चालण्या-फिरण्यास मदत होते
घोड्याचे खुर टणक असतात. मात्र सातत्याने जमीनीच्या संपर्कात आल्याने ते झिजू शकतात आणि तुटू शकतात
नाळ घोड्याच्या खुरांना झिजण्यापासून वाचवते खासकरुन खडकाळ प्रदेशात
नाळ घोड्यांच्या पायाची पकड मजबूत ठेवते. त्यांना विविध प्रदेशात फिरण्यास मदत होते
नाळ घोड्याचे खुरांना जखम होण्यापासून वाचवते. खासकरुन घोडे जे वजन उचलतात आणि लांब पल्ल्याचा प्रवास करतात
धार्मिक मान्यतानुसार, घोड्याची नाळ भाग्य आणि सुरक्षेची प्रतिक आहे. ही घरात किंवा ऑफिसमध्येदेखील लावली जाते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)