कापसासारखी मऊ पोळी तयार करण्यासाठी पीठ मळताना या गोष्टींचा वापर करा.
दही आणि ऑलिव्ह ऑईल पीठात मिसळल्याने पोळ्या मऊ होतात आणि पोळ्यांचा आकारही चांगला येतो.
पीठ मळताना कोमट पाणी घातल्यास पीठ मऊ होते आणि पोळ्याही मऊ होतात.
पीठ जास्त मळल्यास पीठातील ग्लूटेन बाहेर पडते आणि पीठ अधिक मऊ होते.
पीठ मळल्यानंतर 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे. यामुळे पीठ अधिक मऊ आणि घट्ट होईल.
जास्त पाणी घातल्यास पीठ चिकट होऊ शकते, त्यामुळे पोळ्या कडक होतात. म्हणून पाणी लागेल तेवढेचं घालावे.
पोळ्या भाजण्यापूर्वी तव्यावर थोडे तेल किंवा तूप लावल्याने पोळ्या मऊ आणि चवदार बनतात.
पोळ्या लाटताना जास्त दाब देऊ नका. हलक्या हाताने लाटल्यास पोळ्या अधिक फुलतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)