दररोज स्विच बोर्ड स्वच्छ न केल्यास त्यावर धूळ, मळ साचतो आणि चिकटपणा तयार होतो.
अशा वेळेस हे स्विच बोर्ड दिसायला खराब वाटतात आणि त्यांची सफाई कशी करावी, हे अनेकांना समजत नाही.
या काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही हे स्विच बोर्ड सहज स्वच्छ करू शकता.
बेकिंग सोडा आणि थोडी टूथपेस्ट एकत्र करून घ्यावे.त्यानंतर हे मिश्रण स्विच बोर्डवर लावून स्वच्छ पुसून घ्यावे. यामुळे चिकटपणा कमी होतो आणि मळही निघतो.
स्विच बोर्डवरील काळे डाग काढण्यासाठी लिंबाचा रस उपयुक्त ठरतो. लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे स्वच्छतेसोबतच निर्जंतुकीकरणही होते.
साफसफाईसाठी जुन्या टूथब्रशचा वापर केल्यास स्विच बोर्डच्या कोपऱ्यातील धूळ व चिकटपणा सहज निघतो.
स्विच बोर्ड स्वच्छ करताना नेहमी रबर किंवा चामड्याची चप्पल वापरावी. यामुळे विजेचा झटका बसण्याचा धोका टाळता येतो.
हे सर्व उपाय केवळ सोपेच नाहीत तर खर्चिकही नाहीत. दर आठवड्याला एकदा हे उपाय केल्यास तुमचा स्विच बोर्ड नेहमी स्वच्छ आणि नव्यासारखं चमकदार राहील.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)