दही आंबट झालं असेल तर अनेक जण ते फेकून देतात. त्यावेळी ही एक ट्रिक्स वापरून पाहा
पण या पद्धतीने फक्त 1 मिनिटांत दह्यातील आंबटपणा कमी करु शकता.
दह्यातील आंबटपणा कमी करण्यासाठी फक्त हे दोन पदार्थ पाहिजेत दूध आणि चाळणी
सगळ्यात आधी चाळणीच्या सहाय्याने दह्यातील पाणी काढून घ्या. त्यामुळं त्याचा आंबटपणा कमी होतो
आता या दह्यात 2-3 चमचे दूध टाकून चांगलं मिक्स करुन घ्या.
जर तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही ताजे दही यात मिसळून आंबटपणा कमी करू शकता
त्यासाठी समान मात्रेत दही आणि आंबट दही घेऊन चांगलं फेटून घ्या ज्यामुळं दह्याचा स्वाद बिघडणार नाही.