साबणाच्या उरलेल्या तुकड्यांचे करायचे काय? तुम्हालाही प्रश्न पडलाय, वाचा उत्तर

Mansi kshirsagar
Jun 27,2025


साबण संपत आला की त्याचे उरलेले छोटे छोटे तुकडे पायाखाली येतात. अशावेळी हे तुकडे लोक फेकून देतात


तर काही जण नवीन साबणाच्या वर हे छोटे छोटे तुकडे चिटकवतात


आज आम्ही तुम्हाला या उरलेल्या तुकड्यांचे काय करायचे हे सांगणार आहोत


उरलेले साबणाचे तुकडे कपड्यात बांधून दरवाजाच्या मागे किंवा कपाट्याच्या दरवाजामागे ठेवा. छान सुवास येत राहिल


तुमच्या शूजमधून वास येत असेल तर हे साबणाचे तुकडे शूजमध्ये ठेवा. दुर्गंधी गायब होईल


एका पॅनमध्ये साबणाचे तुकडे आणि पाणी मिक्स करुन उकळून घ्या. आता एका स्प्रे बॉटलमध्ये हे लिक्विड भरून घ्या.


रुम फ्रेशनर किंवा बाथरुम फ्रेशनर म्हणूनही तुम्ही त्याचा वापर करू शकता


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story