उन्हाळ्यात प्रत्येक घरात लिंबाचा वापर केला जातो. लिंबू वापरून झाल्यानंतर सगळेच लिंबाची साल फेकून देतात.
मात्र, या लिंबाच्या सालांचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.
घरात स्वच्छतेसाठी कशा प्रकारे या सालांचा वापर होतो, हे जाणून घेऊयात.
लिंबाची सालं पाण्यात उकळून त्या पाण्याने फरशी पुसून काढली तर घरात माश्या येत नाहीत.
जर लिंबाच्या सालांना आणि व्हिनेगरला पाण्यात मिसळून फरशी पुसली तर घर चमकू लागते.
लिंबाच्या सालांना पाण्यात घालून त्यात थोडा बेकिंग सोडा घाला. आता त्या पाण्याने फरशी पुसल्यास घरात किटक येत नाहीत.
लिंबाच्या सालांचे पाणी स्वयंपाकघरात जिथे चिकटपणा असतो तिथे वापरल्याने चिकटपणा जातो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)