फेब्रुवारी महिना सुरु होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता तरुणाईला व्हॅलेंटाईन डे चे वेध लागले आहेत.
7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो.
रोमन साम्राज्यात प्रेमीयुगुलांना लग्नासाठी मदत करणाऱ्या दिग्गज ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असल्याची आख्यायिका आहे.
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात बुधवार 7 फेब्रुवारी 2024 Rose Day पासून होते. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त केले जाते.
प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.
या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन हा दिवस खास पद्धतीने साजरा करु शकता.
या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट म्हणून देऊ शकता.
व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना काही वचने देतात.
या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमळ मिठी देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.
व्हॅलेंटाइन विकचा सहावा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतो. तसेच तुम्ही एखाद्या रोमँटिक लंच किंवा लांबच्या राइडवर जाऊ शकता.