पालक असो किंवा घरातील इतर सदस्य, लहानग्यांचे भरभरून कौतुक करतात.
मुलांच्या लहानपणाची आठवण म्हणून काढलेले फोटो कित्येक जण भिंतींवर लावतात.
पण तुम्हाला माहिती आहे का? लहान मुलांचे फोटोफ्रेम कोणत्या दिशेत लावणे योग्य आहे?
वास्तुशास्त्रात लहान मुलांचे फोटो लावण्याबाबत काही निती नियम दिलेले आहेत.
नियमानुसार लहान मुलांची फोटोफ्रेम पश्चिम (West) दिशेला लावणे योग्य आहे.
पूर्वेला सूर्याची दिशा मानली जाते, फोटो पश्चिम दिशेला लावल्याने मुलांचे तोंड पूर्वेकडे असेल.
असे केल्याने मुलांची बुद्धी तिक्ष्ण होते आणि ज्ञानात वाढ होते.
पश्चिमेला फोटो लावणे शक्य नसेल तर उत्तर-पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्येकडील भिंतींवर फोटोफ्रेम लावू शकता.
(Disclaimer: सदर माहिती वास्तु शास्त्रावर आणि सामन्य ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)