घरात झाडू ठेवण्याचे 'हे' नियम पाळा, नाहीतर कंगाल व्हाल

Pooja Pawar
Sep 20,2024


हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं.


वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू नेमकी कशी ठेवावी याबाबत काही नियम ठरवून दिलेले असतात.


झाडू जर व्यवस्थित ठेवली नाही तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि व्यक्ती कंगाल होतो अशी अनेकांची धारणा आहे.


ज्योतिषी सांगतात की झाडूला घरात नेहमी लपवून ठेवावं.


झाडू नेहमी पलंगाखाली किंवा घराच्या कोणत्यातरी कोपऱ्यात ठेवावा. ज्यामुळे घरात पैसे येत राहतात.


झाडू जिथे पकडला जातो तो भाग नेहमी खालच्या बाजूला ठेवला पाहिजे. जर तुम्ही झाडू अशा प्रकारे उभी करून ठेऊ शकत नसाल तर तिला जमिनीवर झोपवून ठेवा.


जर तुम्ही झाडू घरात इतररत्र कुठेही ठेवत असाल, तुटलेली झाडू वापरत असाल किंवा झाडू पायाने खाली तुडवत असाल तर लक्ष्मी नाराज होते आणि खर्च भरपूर वाढतात.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story