झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत?

Pooja Pawar
Nov 11,2024


वास्तुशास्त्रात झोपण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत. हे नियम पाळल्यास व्यक्ती अनेक समस्यांपासून वाचू शकतात.


घरी झोपताना आपले पाय नेमके कोणत्या दिशेला आहेत याकडे विशेष लक्ष द्यावे.


ज्योतिषाचार्यांच्या सांगण्यानुसार झोपताना तुमचे पाय हे कधीही पूर्व दिशेला करून झोपू नये.


धार्मिक मान्यतेनुसार असं म्हंटल जात की पूर्वेला देवांचा वास असतो. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपल्याने शारीरिक समस्या उद्भवू शकतात.


दक्षिणेला ही यमराजाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला पाय करून झोपू नये असे म्हंटले जाते.


ज्योतिषमान्यतेनुसार दक्षिणेला पाय करून झोपल्याने यमराज नाराज होतात आणि यामुळे मंगल दोषचा सामना करावा लागतो.


झोपताना पाय नेहमी पश्चिम दिशेकडे करून झोपले पाहिजे. असं केल्याने तुमचं डोकं हे पूर्वेकडे असेल जे ज्योतिषशास्त्रानुसार योग्य मानलं जातं.


पूर्व दिशेला सूर्योदय होतो तेव्हा अशावेळी डोकं पूर्वेला करून झोपल्याने ज्ञान वाढतं. तसेच शारीरिक समस्या उद्भवत नाहीत.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story