वडाचे झाड हे दीर्घायुष्य, बळ आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते.
त्याच्या भोवती धागा बांधल्याने पतीच्या दीर्घायुष्याची आणि आरोग्याची प्रार्थना केली जाते.
वट सावित्री व्रताची मूळ कथा सावित्री आणि सत्यवानाच्या अतूट प्रेमावर आधारित आहे.
सत्यवानाचा मृत्यू वडाच्या झाडाखाली होतो आणि सावित्री आपल्या श्रद्धा, संयम आणि व्रताच्या बळावर यमराजाकडून त्याचा जीव परत मिळवते.
त्या घटनेच्या स्मृतीप्रमाणेच, स्त्रिया वडाच्या झाडाजवळ पूजा करून धागा बांधतात.
हा धागा म्हणजे पती-पत्नीच्या नात्याचे बंधन, निष्ठा, आणि सुरक्षिततेची प्रार्थना असे मानले जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)