महिलांना बहुतांश वेळा सौम्य किंवा फिक्या शेडच्या लिपस्टिक आवडतात.
पण अनेकदा चुकून गडद रंगाची लिपस्टिक घेतली जाते आणि तो रंग चेहऱ्यावर सूट न झाल्यास पश्चाताप वाटतो.
जर तुमच्याकडेही गडद रंगाच्या लिपस्टिक असतील आणि त्या कशा वापराव्यात हे समजत नसेल, तर या ट्रिक्स नक्कीच वापरून पाहा.
या ट्रिक्समुळे लिपस्टिकचा रंग सौम्य आणि नैसर्गिक वाटतो आणि एक आकर्षक लूकही मिळतो.
गडद लिपस्टिक लावल्यानंतर तिच्यावर सौम्य रंगाची लिपस्टिक लावा. यामुळे रंग खूप गडदही वाटत नाही आणि खूप फिकटही वाटत नाही.
लिपस्टिक लावल्यानंतर तिच्यावर थोडी फेस पावडर लावा. त्यामुळे लिपस्टिक मॅट आणि सौम्य दिसते.
लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर थोडा कन्सीलर लावल्यास लिपस्टिकचा मूळ रंग सौम्य दिसतो.
गडद लिपस्टिक लावल्यानंतर तिच्यावर सौम्य रंगाचा आयशॅडो किंवा हायलाइटर लावल्यास रंग सौम्य होतो आणि एक वेगळाच ग्लो मिळतो.
सर्वप्रथम लिप बाम लावावा. नंतर लिपस्टिक आणि शेवटी टिशू पेपरने हलकी पुसावी. यामुळे लिपस्टिकचा रंग नैसर्गिक आणि सॉफ्ट वाटतो.
या सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स महिलांना त्यांच्या दैनंदिन मेकअपमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील.