भारतीय जेवणात लोणचं हे आवर्जून असतेच. लोणच्याची एक फोड तुमच्या जेवणाची चव बदलते.
अनेकदा वातावरण बदले की लोणच्यामध्ये पांढरी बुरशी तयार होते, ज्यामुळे लोणचे खराब होते.
लोणच्यामध्ये पांढरा बुरशी लागल्यास त्याला लगेच काढून टाकणे महत्त्वाचे असते.
लोणचे नेहमी सुती कापडाने झाकून मोकळ्या जागी ठेवावे.
लोणचे स्टोअर करण्यासाठी नेहमी स्वच्छ डबा वापरा.
लोणच्यामध्ये कधीही ओला चमचा घालू नये.
लोणच्याला थोड्या थोड्या दिवसांनी सूर्यप्रकाशात ठेवावे.