हिंदू धर्मात भगवान शंकराची उपासना करण्याला विशेष महत्व आहे.
असं म्हटलं जातं की भक्ताने शिवलिंगावर एक तांब्या जल अर्पण केल्यास भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होतात.
परंतु शिवलिंगावर जल अर्पण करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
शिव पुराणाच्या अनुसार शिवलिंगावर जल अर्पण करताना तुमचं तोंड हे दक्षिण किंवा पूर्व दिशेकडे नसायला हवं.
शिवलिंगावर जल अर्पित करत असताना तुमचं तोंड हे उत्तर दिशेला असायला हवं. लक्षात घ्या की नेहमी बसूनच पिंडीवर जल अर्पण करावे.
शिवलिंगावर नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. मान्यता आहे की असं केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात. जल अर्पण करत असताना शंखाचा वापर करू नका.
शिवलिंगावर जल अर्पण करण्याची योग्य वेळ सकाळची असते. तुम्ही सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत पिंडीवर जल अर्पण करू शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)