भगवान श्रीकृष्ण आपल्या गळ्यात नेहमी वैजयंती माळा परिधान करत असत.
धरणी माताने भगवान श्रीकृष्ण यांना सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने वैजयंती माळा भेट म्हणून दिली होती, अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्रात वैजयंती माळेचे अनेक लाभ आणि फायदे सांगितले गेले आहेत. वैजयंती माळा परिधान केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदत होते.
तसेच, वैजयंती माळा परिधान केल्याने व्यक्तीला धन लाभदेखील होतो. जर कोणत्या व्यक्तीला लगेच राग येत असेल तर त्याने नक्की वैजयंती माळा परिधान करायला हवी, असे सांगितले जाते.
वैजयंती माळा परिधान करायची असल्यास ती शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी करावी.
विशेषत: माता लक्ष्मीची साधना करायची असल्यास शुक्रवारी सकाळी अंघोळीनंतर पूजेला सुरुवात करावी.
या व्यतिरिक्त, पूजा करताना वैष्णवायै नम: या मंत्राचा जप करावा आणि त्यादिवशी गरीबांना दान करावे. यानंतर वैजयंती माळा परिधान करावी.
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)