त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात. अनेकदा हे उपाय घरगुती असतात किंवा काही वेळा कैक प्रकारचे क्रिम आणि लोशन वापरले जातात.
घरगुती उपायांमध्येसुद्धा त्वचेसाठी एकदोन नव्हे तर कैक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे मिठाच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ करणं.
मिठाच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ करण्याचे कैक फायदे आहेत. त्यामुळं मिठाकडे दुर्लक्ष नको.
मिठामध्ये नैसर्गिकरित्या विषाणूंना शोषण्याचा आणि त्यांना नष्ट करण्याचा गुणधर्म असतो.
थोजक्यात मिठाच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ केल्यास मुरुमं आणि पुरळांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.
मिठाचं पाणी त्वचेवरील रंध्र कमी करून त्वचेचा तेलकटपणा कमी करतं. मिठाच्या पाण्यानं चेहरा स्वच्छ केल्यानं निस्तेज त्वचा काढण्यास मदत मिळते. (वरील उपाय सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)