कमी झोप मिळाल्यास काय होतं नुकसान?

Pravin Dabholkar
Jun 16,2025


आजकाल खराब लाईफस्टाईल आणि अवेळी खाण्यापिण्यामुळे शरीराची हेळसांड होतेय.


यात अनेकजण स्वत:च्या झोपेकडे कळत नकळत दुर्लक्ष करतात.


अनेकजण रात्री 2-3 वाजेपर्यंत काम करतात. किंवा मोबाईलवर असतात. अशाने त्यांची स्लिप सायकल बिघडते.


फक्त 2-3 तास झोप घेणे पुरेसे नसते. यामुळे शरीराला खूप नुकसान होते. याबद्दल जाणून घेऊया.


कमी झोपेचा हृदयावर परिणाम होतो. त्याला आराम मिळत नाही. यामुळे हार्ट अटॅक, हाय कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या जाणवतात.


पुरेसी झोप न मिळाल्यास डिप्रेशनमध्ये जाण्याचे प्रमाण वाढते. पण अनेकदा लोकांना हे कारणच लक्षात येत नाही.


अपुऱ्या झोपेचा त्वचेवर परिणाम होतो. वयाआधीच सुरुकुत्या, त्वचा सैल होणे अशी लक्षणे दिसतात.


झोप कमी लागल्यास सेक्स ड्राइव्हवरदेखील परिणाम होतो. शरीरावर तणाव येतो.


कमी झोप घेत असाल तर तुम्हाला लठ्ठपणा होऊ शकतो. झोप नसल्याने भूक जास्त लागते. मग तुम्ही खात जाता आणि शरीर वाढत जातं.


कमी झोपेमुळे राग, चिडचिडेपणा, कामावर लक्ष न लागणे अशी लक्षणे दिसतात.


लहान मुलांनी 10-12 तास घ्यायला हवी. तर प्रौढांनी 6-8 तास घ्यायला हवी. अन्यथा तुमच्या शरिरावर परिणाम होऊ शकतो.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story