अननस खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Tejashree Gaikwad
Feb 04,2026


अननसमध्ये ब्रोमेलिन नावाचे एन्झाइम असते, जे अन्न पचायला मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.


अननसात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते.


ब्रोमेलिनमुळे शरीरातील सूज, सांधेदुखी आणि स्नायूंची जळजळ कमी होण्यास मदत होते.


अननस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो.


व्हिटॅमिन C मुळे त्वचा तेजस्वी राहते, कोलेजन तयार होण्यास मदत होते आणि केस मजबूत होतात.


अननसात मॅंगनीज असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे.


जास्त प्रमाणात अननस खाल्ल्यास तोंडाला जळजळ होऊ शकते, त्यामुळे मर्यादेत सेवन करावे.

VIEW ALL

Read Next Story