पपईच्या फायद्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला पपईच्या बियांचे फायदे माहित आहेत का?
पपईच्या बिया या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तसेच अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करू शकतात.
पपईच्या बियांमध्ये कार्पीन, फायटोकेमिकल्स आणि अँटिऑक्सिडंट्स सारखी संयुगे आढळतात जे विविध आरोग्य समस्यांशी लढण्यास मदत करतात.
पपईच्या बियांमध्ये पाचक एंजाइम असतात. यामुळेच बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यांसारख्या पाचन समस्या दूर करण्यासाठी या बिया प्रभावी आहेत.
या बिया आतड्यांमध्ये जंत वाढण्यास प्रतिबंध करतात आणि संक्रमणास प्रतिबंध करतात. पपईच्या बियांचे नियमित सेवन केल्याने परजीवी संसर्गाचा धोका कमी होतो.
पपईच्या बियांचे सेवन केल्याने त्वचेची चमक कायम राहण्यास मदत होते.
या बिया कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फार गुणकारी आहेत. पपईच्या बियांचे नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पपईच्या बियांचे सेवन करण्याचे अनेक आरोग्य फायदे असले तरी त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास नुकसान होऊ शकते. याखेरीज गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी पपईच्या बिया खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)