आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण तासन्तास मोबाईल स्क्रीनकडे पाहत राहतात.
आज आम्ही तुम्हाला भारतातील लोक मोबाईलवर सर्वात जास्त काय पाहतात ते सांगणार आहोत.
फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या सेम्रश ट्रॅफिकच्या अहवालानुसार, भारतातील लोक सर्वात जास्त google.com ला भेट देतात.
गुगल नंतर युट्यूब हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर इंस्टाग्राम आहे. भारतातील लोकांमध्ये सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया म्हणून इंस्टाग्राम आहे.
यानंतर येते फेसबुक. आज जिथे जगात फेसबुकची क्रेझ कमी झाली आहे, तिथे भारतात अजूनही फेबीची फॅन फॉलोइंग आहे.
या यादीत व्हॉट्सॲप पाचव्या क्रमांकावर आहे आणि बरेच लोक एआय देखील वापरत आहेत.