गायीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असून गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असं म्हणतात.
गुरुवार हा आठवड्यातील शुभ दिवसांपैकी एक असून गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाशी संबंधित आहे. तेव्हा गुरुवारी गायीला गुळ खायला दिल्याने कोणता लाभ मिळतो हे जाणून घेऊयात.
गुरुवारच्या दिवशी तुम्ही गायीला गूळ खायला दिल्यास कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो. त्यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या सुद्धा दूर होतात.
गायीला गुरुवारी गूळ खायला दिल्याने रखडलेली आणि बिघडलेली कामं दूर होतात.
तसेच घरातील क्लेश दूर होऊन प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो. गुरुवारच्या दिवशी तुम्ही गायीला गूळ खायला दिल्यास धनाची समृद्धी येते.
गुरुवारच्या दिवशी तुम्ही गायीला गूळ खायला दिल्यास विवाहाशी निगडित समस्या, पितृ दोष दूर होतात.
गुरुवारी सकाळी केली की गायीला चणे गुळात मिसळून खायला घाला. किंवा चपातीवर गूळ टाकून त्यावर चण्याची डाळ टाकून सुद्धा देऊ शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)