रात्रीचा ट्रेन प्रवास करता असताना ट्रेनचे चालक म्हणजे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट हे रात्रभर काय करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट प्रवाशी रात्री गाढ झोपेत असताना काय बोलतात आणि काय करतात.
या दोघांना रात्रीच्या वेळी एकमेकांशी बोलावं लागतं, हा त्यांचा ड्युटीमधील एक नियम आहे.
रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य (पायाभूत सुविधा) प्रदीप कुमार यांनी रात्रीच्या प्रवासातील गुप्त सांगितलं आहे.
ते सांगतात की, रेल्वे मार्गावर एक ते दोन किलोमीटर अंतरावर सिग्नल असतात. तर काही संवेदनशील परिसरात हे अंतर 500 ते 800 मीटरपर्यंत असतं.
पुढे त्यांनी सांगितलं की, प्रत्येक सिग्नलला एक नंबर दिलेला असतो. या सिग्नलजवळून ट्रेन जाते तेव्हा लोको पायलटला तो नंबर मोठ्याने म्हणावा लागतो.
त्यासोबतच त्यांना सिग्नलच्या नंबरसोबत त्याचा रंगही सहाय्यक लोको पायलटला पुन्हा पुन्हा सांगावा लागतो.
सिग्नलला लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग असतात.
उदाहरणार्थ सिग्नल नंबर 1069 असा असेल आणि त्याचा रंग हिरवा, तर लोको पायलट म्हणेल सिग्नल 1069 हिरवा, असो तो दोन तीन वेळा म्हणेल. हे संभाषण त्यांचं रात्रभर सुरु असतं.
त्यासोबत त्यांच्या प्रवासासाठी एक नकाशाही देण्यात येतो. ज्या त्यांना ट्रेनच्या मार्गातील सर्व थांबे, त्यांचे वेळा, वळण, कोणत्या क्षेत्रात किती वेग, कोणतं शहर इत्यादी गोष्टी सांगितल्या असतात.
या नकाशाच्या आधारे लोको पायलट ट्रेन चालवत असतो.