जापानी लोकं त्यांच्या आरोग्याविषयी खूप सजग असतात. ते रोज नाश्त्यामध्ये जापानचे पारंपारिक पादार्थांचे सेवन करतात.
गोहान गोहान हा एका प्रकारचं भात आहे. हे अगदी साध्या पद्धतीने शिजवले जाते.
तांदळामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते.
जापानी लोकं विशेषत: न्याहरीला ग्युरान बनवतात. ग्युरान हा पदार्थ सैल्मन माश्यांपासून बनवला जातो.
सैल्मन नावाच्या माश्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मिसो सुप हा देखील जापानी नाश्त्याचा प्रकार आहे. हे सूप टोफू, समुद्रातील शेवाळ आणि भाज्या वापरून बनवतात.
सागरी शेवाळेमध्ये आयोडीन आणि व्हिटामिन K मोठ्या प्रमाणात असते. ही पोषक तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
नाटो जापानचं एक पारंपरिक खाद्य पदार्थ आहे. हे किण्वन झालेलेल्या सोयाबिनपासून बनवले जाते. नाटो भातासोबत खाल्ले जाते.
किण्वन केलेले पदार्थ पोटासंबंधी आजारांवर फायदेशीर ठरतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)