पाल चावली तर काय होतं? जाणून घ्या

Tejashree Gaikwad
Apr 30,2025


अगदी प्रत्येकाच्या घरात पाल आढळते. रात्रीच्या वेळी सर्रास पालीचा वावर घरात असतो.


पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाल कधी चावली तर काय होतं?


चला भारतीय घरात सामान्यपणे आढळणाऱ्या या पालीबद्दल जाणून घेऊयात.


सामान्यतः पाने चावणे हे धोकादायक नसते. कारण भारतातील कोणत्याही जातीची पाल ही विषारी नाही.


पालीच्या शरीरावर काही विषाणू असू शकतात, पण त्या इतर घरगुती कीटकांपेक्षा कमी धोकादायक असतात.


जर चुकून पालीने चावले तर वेदना, सूज आणि लालसरपणा यासारख्या किरकोळ समस्या उद्भवतात.


या समस्या साध्या उपचारांनी बरी होऊ शकते. मात्र, जास्त त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

VIEW ALL

Read Next Story